मुंबई महानगरपालिकेच्या कोविड काळातील कामाचं स्पेशल ऑडिट व्हावे!

23 Jun 2023 18:25:37

Kirit Somaiya 
 
 
मुंबई : मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळात एक हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कोविड काळातील कामाचं स्पेशल ऑडिट व्हावे,अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. भाजप नरिमन पॉइंट मुंबई कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. व ते बोलत होते.
 
सोमय्या म्हणाले, "मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी खोटी उदाहरणे देऊन कॅगच ऑडिट होऊ दिलं नाही. कॅगने मुंबई महापालिकेला प्रत्त्युत्तर दिलं आहे.कोविड काळात उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित लोकांना कंत्राट देण्यात आली. मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा पुणे पोलीस आयकर विभाग लाईफ लाईन हॉस्पिटलच्या घोटाळ्याची चौकशी करत आहे. या घोटाळ्याचा त्यांनी सुजित पाटकरांशी संबंध असल्याचे सांगितले. संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेवर त्यांनी आरोप केले आहेत. कोविड काळात ब्लॅक लिस्ट कंपनीला वरळी बीएमसी कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले. संजय राऊत यांचा पार्टनर सुजित पाटकर ला या घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागणार." असं ते यावेळी म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0