मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य २७ जून रोजी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. केसीआर यांचा हा दौरा अवघ्या ५ तासांचा असेल. यासाठी भारत राष्ट्र समितीने नागपुरात जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी पक्षाचे झेंडे, बॅनर, पोस्टर्स लावण्यात आले आहेत. शिवाय, तेलंगणा सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे फलक ही लावण्यात आले आहेत.
असा असेल दौरा...
२७ जून रोजी एक वाजताच्या सुमारास केसीआर यांचा नागपुरात आगमन होईल. त्यानंतर ते लगेचच विवेकानंद नगर परिसरात बीआरएसच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. सकाळपासूनच या कार्यालयात तेलंगणामधून आलेल्या पुरोहितांकडून खास पूजा केली जात आहे. कार्यालयाचा उद्घाटन केल्यानंतर केसीआर सुरेश भट सभागृहात बीआरएसच्या मेळाव्याला संबोधित करतील. मेळाव्यानंतर केसीआर चार वाजताच्या सुमारास नागपुरात पत्रकार परिषदही घेणार आहेत.