गोरक्षकांचं कार्य नेमकं कसं चालतं?

    22-Jun-2023
Total Views |
cow
 
नांदेडमध्ये १९ जूनच्या रात्री घडलेल्या गोरक्षकाच्या हत्याकांडाने संपुर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेच्या निषेधार्थ दि. २१ जून रोजी नांदेडमधील काही संघटनांनी बंदची हाक दिली. हे प्रकरण नांदेडच्या इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलयं. हा भाग तेलंगणा सीमेला लागून आहे. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तेलंगणातून ७ गोरक्षक एका कार्यक्रमात सहभागी होऊन घरी येतं होते. ते सर्व एका कारमध्ये बसले होते. दरम्यान, एक ट्रक तेथून गेला. ज्यामध्ये गोरक्षकांना गोवंश असल्याचा संशय आला. गोरक्षकांनी त्या ट्रकचा पाठलाग करून त्या ट्रकला अडवले. त्यांनी ट्रकमधील गाईंनं विषयी चौकशी केली असता. १० ते १५ जण वाहनातून खाली उतरले आणि त्यांनी लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात शेखर रामलु रापेल्ली या गोरक्षकाचा मृत्यू झाला. तर शेखर यांच्या सोबत असलेले ६ साथीदार गंभीर जखमी झाले.
 
दरम्यान कायदेशीर बाबींवर लक्ष ठेवणारी संस्था लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी(एलआरओ) ने दावा केलायं की, हल्लेखोर शेख रफिक मेहबूब याच्या टोळीतील होते. शेख रफिक हा गोवंश आणि गुटख्याची तस्करी करतो.शेखचा बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) संबंध असल्याचा दावाही केला जात आहे. तथापि, अद्याप या दाव्यांना अधिकृत पुष्टी मिळालेली नाहीयं.
 
महाराष्ट्रात आणि देशातही या आधी अनेक गोरक्षकांच्या हत्या झाल्या आहेत. आपला जीव धोक्यात घालून हे गोरक्षक भारतीय संस्कृतीचं प्रतिक आणि हिंदू धर्माचं आराध्य असलेल्या गाईंना कत्तल खाण्यात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्यांनाचं कधी-कधी कट्टरपंथींच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागतात. सोबत देशातील काही मिडीया संस्थांकडून गोरक्षकांचीच बदनामी केली जाते. त्यामुळे आपण या व्हिडोओत गोरक्षक नेमकं कसं कामं करतात? या कामातून त्यांना काही अर्थिक लाभ होतो का? यांची सविस्तर माहिती घेणार आहोत. 
 
गोरक्षकाचं पहिलं कामं आहे ते म्हणजे कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईंची कसायाच्या तावडीतून सुटका करणं. या कामात ते पोलीस प्रशासनाला देखील मदत करतात. महाराष्ट्रात २०१७ पासुन गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यात गोवंश मास विक्रीला कायद्याने बंदी आहे. पण काही समाजकंटक लोकं आजही राज्यात गोमास विक्री करतात. यासाठी हजारों गाईंची कत्तल केली जाते. याला आळा घालण्यासाठी गोरक्षक पोलीस प्रशासनाची मदत करतात. यामुळे ते समाजकंटकाच्या निशाण्यावर येतात. राज्यात आणि देशात अशा हजारों केसेस आहेत ज्यामध्ये समाजकंटकांकडून गोरक्षकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. काही प्रकरणात तर असं लक्षात आलं आहे की, गोरक्षकांच्या परिवारावर सुध्दा जीवघेणे हल्ले करण्यात आलेत.
 
यानंतर दुसरं कामं गोरक्षक करतात ते म्हणजे समाजप्रबोधनांच. हे गोरक्षक खेड्यापाड्यात जाऊन लोकांना गाईंचं भारतीय संस्कृतीतील महत्व समजवून सांगतात. गोधनाचे फायदे आणि सरकारी योजनांची माहिती देखील गोरक्षक लोकांना सांगतात.
 
काही गोरक्षक लोकांच्या देणगीतून किंवा स्वत:च्या पैशातून गोशाळा उभारतात. इथे ते कसायांकडून सोडवलेल्या गाईंची देखभाल करतात. तर कोणी गोपालक आपली गाय कसायाला विकण्याच्या आधी त्याला ते जास्त पैसे देवून त्याच्याकडून गाय खरेदी करतात. अशा गोशाळा राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. गोशाळेत येणाऱ्या गाईं मुख्यत: वयोवृध्द असतात. त्यामुळे त्यांच्यापासुन दूध उत्पादन होण्याची शक्यता नसते. याला उपाय म्हणुन काही गोशाळांनी आता गाईंच्या गौमुत्रावर आणि शेणावर प्रक्रिया करुन त्याच्यापासुन रोजच्या उपयोगातील वस्तु बनवण्याच कामं सुरु केलयं. जसं गाईच्या गौमुत्रापासुन फिनाईल बनवल जातं. शेणापासुन घराच्या पेंटीगसाठी वापरण्यात येणारे उत्तम प्रकारचे रंग बनवले जातात. यामुळे या गोशाळा काही प्रमाणात अर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतायत.
 
आपण या गोरक्षकांचे काम पाहिलं आता आपण या गोरक्षकांना काही मोबदला मिळतो का ते पाहु, तर याचं उत्तर आहे, काहीच नाही. गोरक्षक हे स्वंयसेवक असतात. स्वत:ची नौकरी, व्यवसाय सांभाळत ते प्राचीन भारतीय संस्कृतीच प्रतीक असलेल्या गाईंच्या रक्षणासाठी कामं करतात. यातून त्यांना कसलाही आर्थिक लाभ होत नाही. याउलट त्यांच्या जीवालाचं समाजकंटकांकडुन धोका असतो.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.