हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गियर यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट

22 Jun 2023 15:53:41
Hollywood Actor Richard Gere Met PM Modi

न्यूयॉर्क
: हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गियर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयातजवळ जागतिक योगदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिनेते रिचर्ड गियर यांनी उपस्थिती लावली होती. आणि योगसाधनेचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गियर यांची गळाभेट झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या भेटीनंतर अभिनेते गियर म्हणाले, पंतप्रधान मोदींची भेट घेऊन आपल्याला फार चांगले वाटत असून बंधुभावाचा संदेश आम्हाला वारंवार ऐकायचा आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय संस्कृतीचे द्योतक आहेत, असेही ते म्हणाले.


Powered By Sangraha 9.0