सातारा : उरमोडी, टेंभू आणि जीए कटापूर या तिन्ही योजनांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या प्रकल्पातून सातरा जिल्ह्यातील दुष्काळी भागांना पाणी मिळणार आहे. त्याला गती, फेरप्रशासकीय मान्यता देऊन निधी देण्यासंदर्भात निर्णय झाल्याच फडणवीसांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांच्यासोबत कराडमध्ये एकत्र बैठक केली. बैठकीनंतर बोलताना त्यांनी सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागांना पाणी पुरवठ्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "प्रशासकीय मान्यता देऊन प्रकल्पाच्या कामाला गती देतोय. दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे. मुंबई-बँगलोर कॉरिडोअर मार्गावर मसवड एमआयडीसी तयार करायची आहे. अन्य एमआयडीसीचे प्रश्न आहेत. यासंदर्भात आज बैठक घेतली. केंद्र सरकारने प्राथमिक मंजुरी दिली आहे. लवकरच जमीन अधिग्रहण सुरु करणार आहोत. केंद्र सरकारने त्यांचा वाटा उचलण्याच मान्य केलय.” असं फडणवीसांनी सांगितलं.