मुलुंड अग्निशमन केंद्रावर ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

21 Jun 2023 18:56:10
International Yoga Day Celebrated Mulund Fire Station

मुंबई
: योगा या प्राचीन प्रथेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि भारतीय योगाने जगासमोर आणलेल्या शारीरिक आणि आध्यात्मिक पराक्रमाचा उत्सव साजरा करण्यासाठी मुलुंड अग्निशमन केंद्रावर ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योगा ही एक असा सराव आहे, जी मन आणि शरीराला आराम देण्यासाठी आणि लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. सदर योगा कार्यक्रमाचे संचालन डी.एम. पाटील, अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल यांनी केले आणि सदर कार्यक्रमाला मुलुंड अग्निशमन केंद्रातील कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते.

दरम्यान, या कार्यक्रमाची सुरुवात योग दिनाच्या संक्षिप्त परिचयाने झाली. वॉर्म अप व्यायाम घेण्यात आला आणि सर्व कर्मचार्‍यांनी बसून आणि उभे राहून योग आसन, मुख्य प्राणायाम आणि सुक्ष्म व्यायाम यांचा सराव केला, त्यांचे महत्त्व एकाच वेळी समजावून सांगितले. सर्व कर्मचार्‍यांना त्यांच्या जीवनात योगाचे महत्त्व आणि शरीर आणि मन यांच्यातील सुसंवाद कसा राखायचा हे शिकवण्यात आले. कर्मचार्‍यांनी योगाच्या महत्त्वावर चर्चा केली आणि योगासनांचे प्रदर्शनही केले आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात या क्रियाकलापाचा परिचय करून देण्याचे वचन दिले.



Powered By Sangraha 9.0