एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारांचा मृत्यू संशयास्पद!

20 Jun 2023 15:52:51
Darshana Pawar case update

पुणे
: एमपीएससी परीक्षेत यश प्राप्त करून अधिकारी झालेली तरुणी दर्शना पवार हिचा मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी त्या दृष्टिने तपासाची चक्रे फिरवली आहेत.
 
राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवार या तरुणीचा खून झाला असल्याचा निष्पन्न झाले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमधून तिचा खून झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दर्शना पवार या तरुणीच्या डोक्यात आणि संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळुन आल्या आहेत. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.


Powered By Sangraha 9.0