मुंबईच्या संस्कृतीचे जपानी राजदूतांकडून कौतुक

    02-Jun-2023
Total Views |

japan suzuki 
 
मुंबई : भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. परंतु शहरीकरणानंतर सर्व संस्कृतीचे ऐक्य मुंबईत दिसून येते. ही मुंबईची मिश्र संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. नुकतेच भारतातील जपानचे राजदूत, हिरोशी सुझुकी मुंबईत आले असता, त्यांनी मुंबईच्या संस्कृतीचा आनंद घेतला. मुंबईच्या दैनंदिन जीवनाचे आश्चर्य व्यक्त करत प्रवासाची इच्छा दाखवली.
 
सुझुकी यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले आहे, त्यांनी आज मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेतला. सुझुकी गुरुवारी शहर दौऱ्यावर असताना मुंबईकरांच्या दैनंदिन दिनचर्येचा आश्चर्य व्यक्त करून तसेच ट्रेनच्या गेटवर उभे राहून फोटोही काढले. मुंबईतील वास्तव्यादरम्यान राजदूत सुझुकीने सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे प्रवास करण्याचे ठरवले आणि त्यांनी लोकल ट्रेन पकडली. या अनपेक्षित हालचालीने त्याचे डाऊन-टू-अर्थ व्यक्तीमत्त्व मुंबईकरांना पाहायला मिळाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.