उत्तनमध्ये असलेल्या बस थांब्याला 'बांगलादेश'चे नाव!
19-Jun-2023
Total Views |
भाईंदर : उत्तनमध्ये असलेल्या बस थांब्याला 'बांगलादेश'चे नाव देण्यात आले आहेत. शिवाय, उत्तन परिसरातील चौक येथील एका भागाचा सरकारी कागदपत्रात 'बांगलादेश' असा उल्लेख असल्याचे दिसले आहे. उत्तनमध्ये मासेमारी नौकांवर काम करणाऱ्यांमध्ये बंगाली भाषक लोकांचा समावेश आहे. या परिसराचे मूळ नाव इंदिरानगर आहे. चौक येथील एका भागात हे बंगाली भाषिक लोक राहतात. त्यामुळे या भागाला बांगलादेश म्हणुन संबोधले जाते.
दरम्यान, सरकारी कागदपत्रात 'बांगलादेश' असा उल्लेख असल्याने मनसेने दि. १७ जून रोजी आंदेलन केले. बस थांब्यावरील 'बांगलादेश' या नावावर काळे फासले आहे. तसेच, त्या लोकांच्या आधारकार्ड, मालमत्ता कराच्या देयकांवरही पत्ता म्हणुन बांगलादेश असा उल्लेख करण्यात आला आहे. या नावात योग्य ते बदल करण्यात येतील, असे मिरा-भाईंदर महापालिकेकडुन सांगण्यात येत आहे.