हुतात्मा पोलीसांच्या वारसांना त्वरित अनुकंपा तत्वावर सेवेत घ्या!

13 Jun 2023 16:29:00
Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis

मुंबई
: गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन सेवेतील गट-अ व गट-ब च्या पदावर अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन सेवेत अनुकंपा तत्वावर सामावून घेण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी. यासाठी सेवा प्रवेश नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.


Powered By Sangraha 9.0