सायन पुलावर इलेक्ट्रिकचा पोल कोसळून दुचाकीस्वार जखमी!

12 Jun 2023 15:12:43
 
Sion Bridge
 
 
मुंबई : सायन येथील पुलावर जोरदार वाऱ्यामुळे इलेक्ट्रीक पोल कोसळून एक दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात त्याला फारसी गंभीर दुखापत झाली नाही. शहरात तीन दिवसांपासून बिपरजॉयमुळे सोसाट्याचे वारे सुरु आहेत.
 
वाहतूक कोंडी झाली असतानाच सायन सर्कलच्या पुलावरुन सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर इलेक्ट्रिकचा पोल कोसळल्यामुळे दुचाकीस्वार जखमी होऊन वाहतूक कोंडी झाली आहे. ह्या ठिकाणी दोन इलेक्ट्रिक पोल पडले असून एक पोल थेट दुचाकीवर पडल्याने एक जखमी झाला आहे. या दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला टिळक रुग्णायालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0