मुंबई (प्रतिनिधी): कोकण किनारपट्टीवर सॅटेलाईट टॅग केलेले बागेश्री हे कासव आता प्रवास करत केरळात जाऊन पोहोचलं आहे. केरळच्या किनारी भागाकडे हे कासव वळले असुन ते प्रसिद्ध कोल्लम समुद्रकिनाऱ्यापासुन सुमारे ७५ किमी अंतरावर आहे.
रत्नागिरीतील गुहागर या समुद्रकिनाऱ्यावर बागेश्री आणि गुहा या दोन ऑलिव्ह रिडले कासवांना फेब्रुवारी महिन्यात टॅग करण्यात आले होते. महाराष्ट्र कांदळवन कक्ष, महाराष्ट्र वन विभाग आणि वाईल्डलाईफ इन्सिट्युट ऑफ इंडिया यांच्या सम्नवयाने समुद्री कासवांचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातुन ही कासवे टॅग करण्यात आली होती. भारताच्या पुर्व किनारपट्टीवर आढळणाऱ्या ही कासवे विणीचा हंगाम संपल्यानंतर नक्की जातात तरी कुठे, कोणत्या मार्गाने प्रवास करतात आणि किती लांब प्रवास करु शकतात या सगळ्याचा म्हणजेच त्यांच्या एकुण अधिवासाचा अभ्यास करता येईल यासाठी या कासवांना टॅग करण्यात आले होते.
यानंतर सातत्याने गुहा आणि बागेश्री या दोन्ही कासवांच्या हालचालींचे निरिक्षण केले गेले असुन समाज माध्यमांवर ते वेळोवेळी प्रसिद्ध ही करण्यात आले आहे. रत्नागिरीतील बागेश्री ही केरळात दाखल झाली असुन गुहा कर्नाटकच्या खोल पाण्यात शिरली असुन ती हळुहळु दक्षिणेच्या दिशेने जात आहे.