कर्नाटकला क्रमांक एकचे राज्य बनविणार

09 May 2023 17:58:12
karnataka-assembly-elections-pm-modi-video-message-bjp-vs-congress
 
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये होणार्‍या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील मतदारांना आवाहन केले आहे. त्यात कर्नाटकला विविध क्षेत्रात क्रमांक एकचे राज्य बनविण्याचे आश्वासन दिले आहे.“मतदानाच्या एक दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या मतदारांना एका व्हिडिओ संदेशाद्वारे कर्नाटकच्या जनतेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. गुंतवणूक, इनोव्हेशन व उद्योगांत कर्नाटकला क्रमांक एकचे राज्य बनवण्यासाठी भाजपला मतदान करा,” असे ते म्हणालेत.

पंतप्रधान मोदींचा संदेश...

‘’तुम्ही मला दिलेले प्रेम देवाच्या आशीर्वादासारखे आहेत. कर्नाटकातील जनतेची हाक अजूनही माझ्या कानात गुंजत आहे. स्वातंत्र्याच्या पहाटे आपण भारतीयांनी आपल्या देशाला विकसित भारत बनवण्याची प्रतिज्ञा घेतली होती. त्यानुसार विकसित भारताचे नेतृत्व करण्याची क्षमता कर्नाटकात आहे. कर्नाटकातील डबल इंजिन सरकारचा साडेतीनवर्षांचा कार्यकाळ तुम्ही नुकताच पाहिला. कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेच्या विस्तारात भाजप सरकारची निर्णायक, केंद्रित व भविष्याभिमुख धोरणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.”
 
पंतप्रधान पुढे म्हणाले, “कोरोनासारख्या जागतिक महामारीनंतरही कर्नाटकातील भाजप सरकारच्या कार्यकाळात वार्षिक 90 हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली. मागील सरकारच्या काळात हा आकडा केवळ 30 हजार कोटी रुपये एवढाच होता. विकासाप्रती, कर्नाटकाप्रती व विशेषत: तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपची ही बांधिलकी आहे. गुंतवणूक, उद्योग व नवोन्मेषात कर्नाटकला नंबर-एक बनवायचे आहे. शिक्षण, रोजगार व उद्योजकता यामध्ये भाजपला नंबर एक बनवायचे आहे,” असे आवाहन पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशद्वारे कर्नाटकच्या मतदारांना केले आहे.

 
Powered By Sangraha 9.0