अंबाबाईच्या चरणी ४७ तोळे सोन्याचा मुकूट दान!

    08-May-2023
Total Views |
 
Ambabai
 
 
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीला ४७ तोळे सोन्याचा मुकूट दान करण्यात आला आहे. हे तब्बल २४ लाख रुपये किंमतीचे आहे. हा झगमगीत मुकूट शनिवारी देवीला चढवण्यात आला होता. जालना येथील अध्यात्मिक संस्थानाने शुक्रवारी ४७० ग्राम वजनाचे शुद्ध सुवर्णजडित किरीट अर्पण करायचे ठरवले होते.
 
यासाठी संस्थानाचे पुजारी आणि काही पदाधिकारी शनिवारी किरीट घेऊन अंबाबाईच्या मंदिरात आले होते. त्यांनी तो मुकूट देवीला अर्पण करून दर्शन घेतले. या किरिटाची अंदाजे किंमत २४ लाख रुपये असून या किरिटाचे देवीच्या पायातून पूजन देखील करण्यात आले. यानंतर किरीट देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला. तर समितीने साडी चोळी व प्रसाद देऊन या भाविकांचा सत्कार केला.