आठवलेंचा मोठा गौप्यस्फोट, अजितदादा भाजपमध्ये येणार होते पण...

07 May 2023 17:11:07
ramdas-athawales-reaction-on-the-talk-of-ajit-pawar-joining-the-bjp

सोलापूर :केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी आठवलेंनी अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आठवले म्हणाले की, अजित पवारांच्या मनात अनेक दिवसापासून ठाकरे गट आणि काँग्रेस सोडून भाजपासोबत जाण्याची भूमिका होती. मात्र शरद पवारांचा पाठिंबा नसल्यामुळे अजित पवारांनी आपली भुमिका बदलली असावी, असा गौप्यस्फोट रामदास आठवलेंनी केला.

तसेच शिंदे सरकार कायम राहणार असून आमच्याकडे १६४ आमदार आहेत, असे ही आठवले म्हणाले. त्याचबरोबर पवारांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांच्या व्यतिरिक्त दुसरा मोठा नेता राष्ट्रवादीत नाही. त्यामुळे शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे पवारांनी राजीनामा मागे घेतला असावा, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

Powered By Sangraha 9.0