मुंबई : 'द केरळ स्टोरी' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळतो आहे. मात्र ६ महिन्यांपूर्वी जेव्हा टिझर प्रदर्शित झाले होते त्यावेळेपासूनच काही गटांनी चित्रपट न पाहताच त्याविषयी गरळ ओकायला सुरुवात केली होती. परंतु आज चित्रपट पाहून झाल्यावर मात्र त्यांनी टाळी वाजवल्या आहेत अशी प्रतिक्रिया चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी दिली.
सुदिप्तो सेन म्हणाले, "चित्रपटावर बंदी यावी म्हणून न्यायालयांत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु न्यायालयाने काहीही आक्षेपार्ह नसल्याचे सांगत चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला. लोक काश्मीर फाईल्स आणि केरळ स्टोरी चित्रपटाची तुलना करतात. परंतु माझ्या चित्रपटात असे काहीही दाखवलेले नाही."
ज्या लोकांनी ट्रेलर पाहून एका विशिष्ट समाजगताच्या विरोधात चित्रपट भाष्य करतो असे आरोप केले होते, त्यांनीच चित्रपट पाहून झाल्यानंतर दिग्दर्शक सुदिप्तो सेन याना चित्रपट उत्तम असल्याची पोचपावती दिली आहे.