नवी दिल्ली : दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात दि.२९ मे रोजी एका अल्पवयीन मुलीची साहिल उर्फ मोहम्मद सरफराज यांने सूरा भोसकूनव हत्या केली. आरोपी मोहम्मद सरफराजला पोलीसांनी अटक केली असून या हत्याकांडात ६ आणखून संशयितांचा शोध पोलीसांकडून सुरू आहे.त्यातच एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून कळत आहे की, साहिल हा शाहबाद परिसरात एका मुलाशी बोलत होता. तसेच दोघेही फोनवर काहीतरी पाहत होते.
तसेच साहिलचे इंस्टाग्राम हँडल 'sahi.lkhan3600' वर हुक्का पार्टीपासून सिद्धू मुसेवालाच्या गाण्यांपर्यंत अनेक व्हिडीओ आहेत. त्याच्या इंस्टाग्राम हायलाइट्समध्ये एक व्हिडिओ देखील आहे, ज्यावरून तो कट्टर इस्लामी असल्याचे सूचित करतो. त्याने त्याच्या 'इन्स्टाग्राम हायलाइट्स'मध्ये जी स्टोरी टाकली आहे . त्यात एक व्यक्ती बंदूक घेऊन चालताना दिसत आहे. तो व्हिडीओ समीर ६००० या इंस्टाग्राम हँडलवरून सहिलने शेअर केलेला आहे. त्यात तो व्यक्ती म्हणतो की, "आम्ही अल्लाहशिवाय इतर कोणाची भीती बाळगणे हे शिर्क मानतो." इस्लाममध्ये मूर्तिपूजेला 'शिर्क' म्हटले जाते आणि ते हराम मानले जाते. साक्षीची मैत्रीण असलेल्या आरतीनेही सांगितले होते की, ती सहिल खानला हिंदू मानत होती.
दरम्यान इंस्टाग्रामवरील एका व्हिडीओत साहिल हुक्का ओढताना दिसत आहे.तर बॅकग्राउंडमध्ये 'दिल्ली में करता बदमाशी' हे गाणे वाजत आहे. साहिलने काही दिवसांपूर्वी एक चाकू विकत घेतल्याची माहिती ही उघडकीस आली आहे. अनेक लोक साहिलला 'सनी' नावानेही ओळखत होते. साहिलने खुनात वापरलेले हत्यार रिठाळा येथे फेकले आहे. साहिल आई-वडील आणि तीन बहिणींसोबत भाड्याच्या घरात राहत होता. हत्येनंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने फोन बंद केला होता आणि आता तो तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.