जूनपासुन वंदे भारत एक्सप्रेस चाकरमान्यांच्या सेवेत!
30-May-2023
Total Views |
रत्नागिरी : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासी विशेषता मुंबई आणि कोकणातील रेल्वे प्रवासी कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या सीएसएमटी मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या मार्गावरील वंदे भारत ट्रेनचे १६ मे रोजी ट्रायल रन कम्प्लिट झाले आहे. आता मुंबई गोवा सुसाट ७ तासांमध्ये गाठता येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणार असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाची तारीख अजूनही निश्चित झाली नसली तरी आता अवघ्या काही दिवसातच मोठी प्रतीक्षा संपणार आहे.
तेजस एक्स्प्रेसपेक्षाही वेगानं ही ट्रेन जाणार आहे. वंदे भारत ही त्या सर्वांमध्ये सर्वात वेगवान ट्रेन आहे. म्हणून आता ही गाडी प्रवाशांच्या सेवेत केव्हा दाखल होणार? या गाडीला हिरवा बावटा केव्हा दाखवला जाणार? असा प्रश्न मुंबईकरांना आणि कोकणवासियांना पडला आहे.