गर्भवती राहिल्यावर धर्मांतरणासाठी दबाव! नावेदनं केली सीमाची विष देऊन हत्या

    29-May-2023
Total Views |
uttar-pradesh-shahjahanpur-pregnant-dalit-woman-raped-later-given-poison-for-refusing-conversion

लखनऊ : उत्तर प्रदेशातील शाहजहानपूरमध्ये लव्ह जिहाद करून तरुणीची हत्या केल्याची घटना २७ मे रोजी उघडकीस आली आहे. नावेदने आपली ओळख लपवत हिंदू दलित तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर ती गर्भवती राहिली त्यानंतर नावेद तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकू लागला. जेव्हा तिने इस्लाम स्वीकारला नाही तेव्हा नावेदने विष देऊन तिची हत्या केली.

या पीडीत तरुणीचे नाव सीमा गौतम असे आहे. ती मूळची लखीमपूर येथील पालियाकलानची आहे. पीडित तरुणी शाहजहानपूर येथील डॉ. श्रॉफ आय चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. त्यावेळी नावेद नावाच्या तरूणाशी तिची ओळख झाली. त्यावेळी नावेदने तो हिंदू आहे, असे सीमाला सांगितले होते. दोघेही गेल्या दीड वर्षांपासून शहाजहानपूर येथे भाड्याच्या घरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते.



मात्र दि. २८ मे रोजी नावेद त्याच्या दोन साथीदार मुस्तकीम आणि फरहादसह ​​सीमाला बेशुद्ध अवस्थेत घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. हॉस्पिटलमध्ये नावेदने स्वत:ची ओळख शोएब सिद्दीकी आणि सीमाची ओळख झोया सिद्दीकी अशी दिली. तपासादरम्यान डॉक्टरांनी सीमाला मृत घोषित केले. यानंतर नावेदने त्याच्या साथीदारांसह तेथून पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, रुग्णालयातील कर्मचारी आणि उपस्थित लोकांनी तत्परता दाखवत त्याला पकडले.

त्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक चौकशीनंतर मुख्य आरोपी नावेदचे सत्य समोर आले. यानंतर पोलिसांनी नावेद आणि त्याचा साथीदार फरहादला ताब्यात घेतले. त्याचवेळी सीमाच्या मृत्यूनंतर ही माहिती तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली. दरम्यान सीमा गौतमच्या भावाने नावेद आणि त्याच्या साथीदारांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.त्यात नावेदने आपले नाव बदलून सीमासोबत अवैध संबंध ठेवले. नावेद आणि त्याचे साथीदार अश्लील व्हिडिओ बनवून सीमावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत होते. त्यामुळेच या संबधी माहिती कुंटूबाला देऊ नये यासाठीच नावेद आणि त्याच्या साथीदारांनी विष पाजून सीमाची हत्या केली,असे सीमाच्या कुटूंबीयांचे म्हणणे आहे.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.