तुर्कस्तानात पुन्हा एर्दोगन यांची सत्ता

29 May 2023 15:51:00
Turkey Presidential Election

नवी दिल्ली
: तुर्कीच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रेजप तैयप एर्दोगन यांनी विजय मिळवला.त्यांना सलग तिसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले. एर्दोगन यांनी विरोधी पक्ष नेते कमाल किलिचदरोग्लू यांचा पराभव केला. दि. २८ मे रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानात एर्दोगन यांना ५२.१४ टक्के तर किलिचदरोग्लू यांना ४७.८६ टक्के मते मिळवण्यात यथ आले. तर पहिल्या टप्प्यातील मतदानात कोणत्याही नेत्याला बहुमत मिळाले नव्हते.

एर्दोगान गेल्या दोन दशकांपासून तुर्कस्तानमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सत्तेत आहेत आणि त्यांची लोकप्रियता आजही कायम असल्याचे या निवडणुकीच्या निकालांवरून दिसून येते. विरोधी पक्षाचे उमेदवार कमाल यांनी देशात सत्ता आणि व्यवस्था बदलण्याचे आश्वासन देऊन निवडणूक लढवली, पण विजय मिळवण्यात ते थोडक्यात हुकले. एर्दोगन हे तुर्कीच्या पुराणमतवादी आणि धार्मिक न्याय आणि विकास पक्षाचे (AKP) अध्यक्ष आहेत.


 
Powered By Sangraha 9.0