पुण्याची जागा भाजपाच जिंकणार : दिपक केसरकर

29 May 2023 16:18:08
 
Deepak Kesarkar
 
 
मुंबई : पुण्यात कोणीही लढु द्या, जिंकणार भाजपाच. पुणे भाजपचा बालेकिल्ला आहे. असा दावा मंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे. विनायक राऊतांनी शिंदेंसोबतचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. यावेळी केसरकरांनी विनायक राऊतांच्या वक्तव्याचा ही समाचार घेतला आहे. शिल्लक आमदार, खासदार सोडुन जाऊ नये, यासाठी त्यांची ही वक्तव्ये असतात. असं केसरकरांनी सांगितलं.
 
दिपक केसरकर म्हणाले, "पुण्याची जागा लढवण्याआधी मविआने सांगावं कोण लढवणार आहे. पवार म्हणतायत आम्ही जागा लढवणार. काँग्रेस म्हणतयं आम्ही जागा लढवणार. पण, पुण्यात कोणीही लढु द्या, जिंकणार भाजपाच. पुणे भाजपचा बालेकिल्ला आहे. शंभर टक्के भाजपाचा उमेदवार निवडुन येणार. याची आम्हाला खात्री आहे." असा विश्वास केसरकरांनी यावेळी व्यक्त केला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0