मुंबई : मागील काही काळापासून सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत असून यासंबंधी गुन्ह्यांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. मात्र सायबर गुन्ह्यांची संख्या एकीकडे वाढ असताना त्यावरील कारवाई मात्र अतिशय संथ गतीने होत असल्याची माहिती समोर आली आहे. मागील चार महिन्यांमध्ये सुमारे ८०५ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत केवळ ५४ गुन्ह्यांवर ठोस कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे.
सायबर फसवणूक – ८०५ गुन्हे, जॉब फ्रॉड – ११६ गुन्हे, खरेदी – ५६ गुन्हे, फेक वेबसाइट – ४५ गुन्हे, गुंतवणुकी गुन्हे – ३३ गुन्हे, कस्टम फसवणुकीचे गुन्हे – २४ गुन्हे इ. गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दरम्यान, सायबर गुन्ह्याची कल्पना येताच तक्रारदाराने तात्काळ पोलिसांकडे धाव घेणे गरजेचे असते. यामुळे पोलिसांना लवकरात लवकर कारवाई करणे शक्य होते आणि पोलिसांच्या या कारवाई करण्याच्या अवधीला ‘गोल्डन Hour’ असे म्हणत असल्याची महिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.