शिर्डी : “अंदाज कुछ और है सोचनेका, मुझे शौक है रास्ता बनाने का,” अशी शेरोशायरी, मिष्क्रिल टिप्पणी आणि विरोधकांचा खरपूस समचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी ‘समृद्धी’ महामार्गाच्या दुसर्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. शिर्डी ते भरवीर या ८० किमी महामार्ग खुला झाला असून सहा ते आठ महिन्यांत संपूर्ण मार्ग सुरू होणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तिसर्या टप्प्याचे जेव्हा लोकार्पण होईल तेव्हा तो थेट मुंबईपर्यंत जाईल,” असेही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अनेक लोकांनी या महामार्गाला विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेत महामार्गाला विरोध केला. शरद पवार यांनी सांगितलं की हे शक्य नाही. ज्या गावात विरोधकांनी सभा घेऊन सांगितलं की हा मार्ग होऊ देणार नाही. त्याच गावात जाऊन एकनाथ शिंदे यांनी लोक जमीन द्यायला तयार आहेत, अशाप्रकारचे मुझे शौक है रास्ता बनाने का पत्र जमा केले. त्या गावात पहिली रजिस्ट्री केली. देशातील विक्रम आहे, ७०१ किमी जमीन नऊ महिन्यांत संपादन केली. अधिकार्यांनी यात प्रचंड मेहनत केली,” असे फडणवीस म्हणाले.
राज्याचा विकास करायचा असेल, तर राज्याचा मागास भाग मुंबईशी जोडणे आवश्यक होते. अनेक लोकांना हे स्वप्न आणि फक्त घोषणा वाटायची. पण, मला आणि एकनाथ शिंदे यांना विश्वास होता की हे काम रेकॉर्डटाईमवर पूर्ण होईल.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
गेल्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या ५२० किमी लांबीच्या ‘समृद्धी’ महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. त्यानंतर प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर, नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण ६०० किमीचा रस्ता खुला झाला आहे.
‘समृद्धी’ची संकल्पना देवेंद्र फडणवीस यांची यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “ ‘समृद्धी’ची संकल्पना देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. सर्वोच्च न्यायालयाने जसा आपल्या सरकारचा मार्ग जसा मोकळा केला तसाच आपण ‘समृद्धी’ महामार्गाचा मार्ग मोकळा केला आहे. शेवटचा १०० किलोमीटरचा टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी माझ्याकडे काही कामच नव्हतं. तेव्हा, फडणवीसांनी सांगितलं, असं काम देतो दुसरं काम करण्याची गरजच पडणार नाही. तेव्हा त्यांनी माझ्याकडे ‘समृद्धी’ महामार्गाचं काम दिलं अन् मीही रस्त्यावर उतरून काम केलं. ‘समृद्धी’ महामार्गाचा शेवटचा आणि तिसरा टप्पा येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. हा १०० किलोमीटरचा टप्पा आहे. यासह राज्यात सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचं आश्वासन शिंदेंनी दिले.”
अनेक अडथळे आले, विरोध केला गेला. परंतु, आम्ही अडचणीतून मार्ग काढून पुढे जात राहिलो. शेतकर्यांना तीन तासांमध्ये आम्ही पैसे देण्याचं काम केलं, त्यामुळे शेतकर्यांचा विश्वास वाढत गेला.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.