मॉरिशसमध्ये होणार स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्याचे अनावरण

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित

    24-May-2023
Total Views |
Statue of Swatantraveer Savarkar unveiled in Mauritius

मुंबई
: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगते अग्निकुंड असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मॉरिशसमध्ये भव्यदिव्य पुतळा उभारण्यात आला आहे. मॉरिशसची राजधानी असलेल्या पोर्ट लुईसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला असून, सावरकरांच्या जयंतीनिमित्त्त रविवार, दि. २८ मे रोजी या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
शिवरायांपाठोपाठ सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

मॉरिशसमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. यापूर्वी मॉरिशसमधील ’महाराष्ट्र भवन’च्या आवारात स्थापित छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला असून त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.