पवारांच्या बहिणीची भावनिक साद ; बहीण म्हणून मला...

02 May 2023 16:51:21
sharad-pawar-sister-on-his-ncp-president-post-resignation-saroj-patil

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' ह्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर तुमच्या राजीनाम्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान होई, तुमच्यासारखे नेतृत्व आधी तयार करा मगच राजीनामा द्या, असे भावनिक आवाहन शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर "बहीण म्हणून मला तुमचा सहवास हवा आहे. त्यामुळे लोकांच्या भावना लक्षात घेता आपण विचार करावा" ,असे ही सरोज पाटील म्हणाल्या.

तसेच सरोज पाटील म्हणाल्या की, लोकशाही जगते की नाही? हे माहिती नाही. जाती-जातीत आणि धर्माधर्मात तेढ निर्माण होत आहे. पुढच्या पिढीला काय देणार?, अशी अवस्था आहे. अशात शरद पवार यांनी राजीनामा दिला. त्यांचा हा धक्का लोकांना पचत नाही, अशी प्रतिक्रिया सरोज पाटील यांनी दिली. त्यामुळे पवारांनी राजीनामा दिल्याचे दुःख असून पवारांनी तो परत घ्यावा. तसेच पवारांनी स्वता:सारखे पर्यायी नेतृत्व तयार करून राजीनामा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


Powered By Sangraha 9.0