मुंबई : आपल्या अभिनयाने एकेकाळी हिंदी चित्रपट सृष्टीतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आणि त्यानंतर इथेच गुंतलेले मनस्वी अभिनेते सतीश शाह आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. परंतु त्यांनी एकाएकी चित्रपटातून काम करण्याचे का सोडले याचे उत्तर मात्र त्यांनी इतक्या वर्षांनी दिले आहे. हमशकल या चित्रपटानंतर त्यांनी स्वतःचा राग करून चित्रपटात यापुढे काम करणार नसल्याचे ठरवले.
एका मुलाखतीत ते म्हणाले, "जर मला अभिनय करावासा वाटला तर करेन पण आताशा मला या चित्रपटसृष्टीत कोणत्याही चित्रपटात काम करावेसे वाटत नाही. मी फक्त पैशासाठी चित्रपट करु शकत नाही. जेव्हा मला आतून प्रेरणा मिळेल तेव्हाच मी चित्रपट करेन. माझा शेवटचा चित्रपट 'हमशकल्स (2014)' केल्यानंतर कदाचित मी आतून नाराज झालोय." सतीश यांनी पुढे म्हटलं की, "मी चित्रपटात काम करण्याचं वाचन देऊन बसलो. स्वतःशी आणि दिग्दर्शकाशी वचनबद्ध होतो. त्यामुळे मला सांगितलं गेलं ते सर्व चित्रपटात करावं लागलं. हा माझ्या विनोदाचा प्रकार नव्हता. लोकांनी मला सांगितलं की, माझं काम प्रभावी आहे, पण त्यामुळे चित्रपट बनत नाही. 2014 साली आलेला 'हमशकल्स' बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला होता."
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सतीश शाह होय. हे अभिनेते आजही 'जाने भी दो यारो (1983), 'ये जो है जिंदगी (1984)', 'हम साथ साथ है'(१९९९),'मैं 'हूं ना' (2004), कल हो ना हो (2003), फना (2006) आणि ओम शांती ओम (2007) यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या कॉमिक भूमिकांसाठी ओळखले जातात.