कर्नाटक : कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात सुन्नी वक्फ बोर्डाच्या वकतव्याने खळबळ माजलेली पाहायला मिळते आहे. सुन्नी वक्फ बोर्डाने काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. त्याचबरोबर मुस्लीम समाजाला पाच मंत्रीपद द्यावीत अशी मागणीसुध्दा सुव्नी वक्फ बोर्डाने काँग्रेसकडे केली आहे. मंत्रीपदाच्या मागणीत गृह, महसूल, आरोग्य अशी अत्यंत महत्त्वाच्या पदांची मागणी बोर्डाने केली आहे.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आधीच सुन्नी वक्फ बोर्डाने काँग्रेसकडे ३० जागांची मागणी केली होती. परंतु, पक्षाने केवळ १५ जागांवर मुस्लिम उमेदवार दिले. त्यातील ९ उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे काँग्रेसच्या ७० जागांवर मुस्लिम समाजाने काँग्रेसला मतदान केल्याचे आढळून आले. एकंदरीत, या सुन्नी वक्फ बोर्डाच्या मागणीमुळे कर्नाटकात मुस्लिम समाजाचा उपमुख्यमंत्री होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.