हिंदू एकता यात्रेदरम्यान अदा शर्माचा अपघात; इतर टीम सुखरूप

15 May 2023 12:30:28
 
ada sharma
 
मुंबई : द केरला स्टोरी चित्रपटाला तुफान यश मिळत असताना अभिनेत्री अदा शर्माला मात्र ट्विटरच्या माध्यमातून काही धमक्या मिळत होत्या. त्यानंतर तिचा अपघात झाल्याची बातमी खुद्द अदा हिने आपल्या ट्विटर हँड्लर वरून दिली आहे. दरम्यान अपघात झाला असला तरी आपण सुखरूप असल्याचे वृत्त दादाने जाहीर केले आहे तसेच चाहत्यांनी चिंता करू नये, चित्रपटाची संपूर्ण टीम सुखरूप असून मी स्वतःही व्यवस्थित असल्याचे तिने यावेळी सांगितले.
 
द केरळ स्टोरीची टीम तेलंगणा येथील करीम नगरमध्ये हिंदू एकता यात्रेत चालत होती. यावेळी रस्त्यावरच हा अपघात झाल्याचे समजते. अपघाताचे स्वरूप अजूनही स्पष्ट झाले नसून आपण सुखरूप आहोत असे स्पष्टीकरण अदा हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केले आहे.
 
चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटून गेला आहे. पहिल्याच आठवड्ययात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाला मिळणारे यश आणि चित्रपटाचा विषय याला घेऊन अनेक दिवसांपासून समाजमाध्यमांवर वाद सुरु आहेत. या वादातूनच अदाला अनेक धमक्यांना सामोरे जावे लागले. या धमक्यांचे आणि अपघाताचे काही सूट असावे का असा प्रश्न समाजमाध्यमांतून विचारला जात आहे. परंतु तो वृथा असल्याचे उपलब्ध माहितीतून समोर येत आहे.
Powered By Sangraha 9.0