काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना ‘ते’ वक्तव्य भोवले

15 May 2023 20:06:24
kharge

अमृतसर
: कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बजरंग दलाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी खर्गे यांना पंजाबमधील संगरूर जिल्हा न्यायालयाने समन्स पाठवले आहे. खर्गे यांनी बजरंग दलाच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले. हिंदू सुरक्षा परिषदेचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटल्यात ही कारवाई झाली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत बजरंग दलाविरोधात अपमानजनक वक्तव्य आणि जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा या प्रकरणी बजरंग दल हिंदचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी १०० कोटीचा मानहानी घटला दाखल केला आहे. सिव्हील जज सीनियर डिव्हीजन रमणदीप कौर यांच्या न्यायालयात मल्लिकार्जुन खर्गे यांना १० जुलै रोजी बोलवण्यात आले आहे.

हितेश भारद्वाज यांनी दावा केला आहे की, काँग्रेसने बजरंग दलाची तुलना देशविरोधी संघटनांसोबत केली आणि कर्नाटकमध्ये सत्तेत आल्यानंतर बजरंग दलाविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन देखील दिले आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने केस लिस्ट केली असून सिव्हील जज (सीनियर डिव्हीजन) रमणदीप कौर यांच्यासमोर मल्लिकार्जुन खर्गे यांची १० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. यामुळे खर्गे अडचणीत आले आहेत.


Powered By Sangraha 9.0