'पठाण'ला मागे टाकत , 'द केरला स्टोरी'ने जगभरात १०दिवसांत केली १५० कोटींची कमाई!

14 May 2023 16:36:40
the-kerala-story-box-office-collection-how-much-crore-leaves-behind-shahrukh-khan-movie-pathaan

नवी दिल्ली
: 'द केरला स्टोरी' या चित्रपटाने १० दिवसांत जवळपास १३६ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचा दुसरा हफ्ता कमाईच्या दृष्टीने चांगला होता. दि. १२ मे रोजी या चित्रपटाने १२.३५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तसेच दि.१३ मे रोजी या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन १९.५० कोटी रुपये होते. मात्र दि.१४ मे रोजी या चित्रपटाने २३ कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि अशा प्रकारे त्याने १० दिवसांत १३६ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

जर आपण जगभरातील चित्रपटाच्या कमाईबद्दल बोललो तर या चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला आहे. 'द कश्मीर फाइल्स' आणि 'कंतारा' ब्लॉकबस्टर ठरल्याप्रमाणे हा चित्रपट ट्रेंडमध्ये आहे. 'द केरला स्टोरी' स्टोरी'ला सुपर-डुपर हिट असे शीर्षक मिळाले असून हा चित्रपट ब्लॉकबस्टरच्या श्रेणीतही येऊ शकतो. याने कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या 'पठाण'लाही मागे टाकले आहे. 'पठाण'ने ११७.२८% नफा कमावला.


 
'पठाण'चे बजेट जवळपास २९४ कोटी रुपये होते, तर 'द केरला स्टोरी' स्टोरी'चे एकूण बजेट यापैकी १० वा म्हणजे ३० कोटी रुपये आहे. अशा प्रकारे टक्केवारीच्या नफ्याच्या बाबतीत 'पठाण' खूप मागे राहिला आहे. 'द केरळ स्टोरी'ने १० दिवसांत २८३% नफा कमावत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. चित्रपटाचा निव्वळ नफा सुमारे १०६ कोटी रुपये आहे. आता 'द केरला स्टोरी' आणखी कमाई करेल.

या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली असून सुदीप्तो सेन याचे दिग्दर्शक आहेत. यात अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिल्याबद्दल अदा शर्माने सेन्सॉर बोर्ड आणि सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. हा चित्रपट अधिकाधिक तरुणींना दाखवण्याचा सल्ला त्यांनी दिला.' द केरला स्टोरी'स्टोरी'मध्ये हिंदू मुलींना कशा प्रकारे टार्गेट करून धर्मांतराच्या जाळ्यात अडकवले जाते हे सांगितले आहे.



Powered By Sangraha 9.0