कर्नाटक : कर्नाटक सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंची निवड केली आहे. कर्नाटक सत्तास्थापनेची मोठी जबाबदारी त्यांच्यावर काँग्रेस हायकमांडने सोपविली आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे कर्नाटक सत्तास्थापनेत पर्यवेक्षकाची भूमिका बजावणार आहे. कर्नाटकात दि.१३ मे रोजी विधानसभेचा निकाल जाहीर झाला. काँग्रेसला स्पष्ट बहुमत जनतेने दिले. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी कुणाची निवड होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. डी के शिवकुमार, सिध्दरामैय्या यांच्यासमवेत आणखी दोन नेत्यांमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पाचारण केल्याचे समजते आहे. दरम्यान, कर्नाटकातील सत्ता तिढ्याचा अहवाल सोपविण्याचे निर्देश हायकमांडने शिंदेंना दिले आहेत.