आदित्य ठाकरे दिल्लीत ; केजरीवाल, ठाकरे भेटीनं चर्चेला उधाण

    14-May-2023
Total Views |
aditya-thackeray-met-arvind-kejriwal-in-delhi

नवी दिल्ली
: ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत.त्यांनी दि.१४ मे रोजी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यावेळी त्या दोघामध्ये देशाच्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती केजरीवाल यांनी त्यांच्या ट्विटर वरून दिली आहे.यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदीही होत्या.तसेच यावेळी लोकशाही आणि आपली राज्यघटना धोक्यात आहे आणि आपण तिचे सर्व प्रकारे संरक्षण केले पाहिजे, असे आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर वरील पोस्टमध्ये लिहले आहे. त्यामुळे ही भेट नेमकी भविष्यात कोणत्या दिशेने ठाकरे गटाचा राजकीय प्रवास घडवून आणते हे पाहणे ही महत्तवाचे ठरेल.