मुंबई : कर्नाटक निवडणुकीतील पराभवाने भाजपाच्या नेत्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या संजय राऊतांवर तुफान टोलोबाजी नितेश राणे यांनी केली आहे. राणे म्हणाले की, काल कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर अनेक ठिकाणी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले गेले. इतकच नाहीतर अनेक ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे फडकवल्या गेल्याचा धक्कादायक खुलासा राणेंनी केला आहे. त्यामुळे कर्नाटकत काँग्रेसच्या विजयानंतर आनंद साजरे करणारे राऊतांनी पाकिस्तानचा झेंडा घेऊन मातोश्रीवर लावावा.त्यामुळे राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्तवात पाकिस्तानचा झेंडा मातोश्रीवर लवकरच फडकवला जाईल , असा दावा नितेश राणेंनी केला आहे. त्यामुळे ठाकरेंवर देशद्रोहोचा खटला भरवा. अन्यथा राऊत बिलावल भुट्टोला देखील मातोश्रीवर आणतील , असा टोला ही राणेंनी राऊतांवर लगावला.
दरम्यान कर्नाटकात काल काँग्रेस जिंकली की पाकिस्तान? , असा सवाल नितेश राणेंनी राहुल गांधी आणि काँग्रेसची वकीली करणाऱ्या राऊतांना केला आहे. तसेच पाकिस्तान आणि राहुल गांधीची भाषा एकच असल्याचे ही राणे म्हणाले.