"लवकरच मोठं सरप्राईज!" ठाकरे गटातील उर्वरित आमदारही शिवसेनेत येणार!

12 May 2023 14:22:40
 
Shrikant Shinde
 
 
मुंबई : लवकरच मोठं सरप्राईज मिळणार, ठाकरे गटातील उर्वरित आमदारही शिवसेनेत येणार. असा मोठा गौप्यस्फोट खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. ठाकरे गट लोकांची दिशाभूल करण्याचा काम करत आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर कोर्टाने निकाल दिलाय.तरीही, एक नरेटिव्ह सेट केला जातोय.काही लोकं हा निकाल त्यांच्या बाजूने कसा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. असा टोला ठाकरे गटाला लगावला आहे.
 
श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, "असं दाखवलं जातय की, आमच्या सर्व मागण्या कोर्टाने फेटाळल्या आहेत आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या. असं दाखवलं जातय. मी हवेत बोलणार नाही, काही लोकं हवेत बोलतात. सध्या खोटं बोलण्याचं काम सुरु आहे. समोरच्यांनी केलेल्या प्रेयर्स वाचून दाखवतो. कोर्टाने दिलेल्या निरीक्षणांचे आम्ही स्वागत करतो. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री पद रिकामे होते त्यानंतर बीजेपीच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी बसले ते कायद्याने योग्य आहे असं कोर्टानं म्हणटलय."
 
"फ्लोअर टेस्ट विरोधात हे लोकं कोर्टात गेले होते तेव्हा ही कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली होती. घाबरुन राजीनामा दिला होता आणि आता नैतिकतेच्या गोष्टी करतायेत. उपाध्यक्षांकडे सर्व अधिकार देण्याची विरोधकांची मागणी कोर्टाने फेटाळली आहे.
मुख्यमंत्री यांना नियमाने निवडून दिलय. फ्लोअर टेस्टच्या दिवशी ११४ पैकी ९९ लोकं विरोधकांचे आले होते म्हणजेच १४ जण अनुस्थित राहून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. हे लोकं स्वतःला कोर्टापेक्षा जास्त मोठं समजत आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणुन रुजू होण्याचे आदेश द्यावेत ही मागणी देखील विरोधकांची कोर्टाने फेटाळली आहे. नैतिकता असती तर त्यांनी मविआ सोबत सरकार स्थापन केले नसते. व्हिप आणि प्रतोद स्विकारण्याचा अधिकार कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे." असं ठाकरे गटाला प्रत्त्युत्तर श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0