मुंबई : उद्धव ठाकरेंसाठी आजचा दिवस म्हणजे बाळासाहेबांचा शाप आहे. असं आमदार नितेश राणेंनी सत्तासंघर्षाच्या निकालावर प्रतिक्रीया देत म्हटलं आहे. यावेळी राणेंनी संजय राऊतांच्या ट्विटचा देखील समाचार घेतला. "काय डोंगर काय हे सगळं बोलून बोलून ट्विट करत होते. आता ते मुन्नाभाई MBA, LLB गेले कुठे? त्यांना विचारा आता की कायदा तुम्हाला जास्त कळतो? की नार्वेकरांना जास्त कळतो? ते तुमच्या मालकाच्या मुलाच्या शिक्षकाला जास्त कळतो? म्हणून जे काय कायद्याच्या अनुसार होणार होतं. ते सगळं झालेल आहे." असं राणे म्हणाले.
"अपात्रतेचा अधिकार जे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत होतो, आणि आमचे अध्यक्ष राहुल नार्वेकर पण बोलत होते की हे ते अधिकार माझ्याकडेच येणार, त्याप्रमाणेच आज कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आता महाराष्ट्राचा विकास करण्याची जबाबदारी आता शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर आहे, आणि त्या पद्धतीने पुढे जाणार. उद्धव ठाकरेना हा बाळासाहेबांनी दिलेला शाप आहे. त्याच्यामुळे हा आजचा दिवस त्यांना बघायला भेटतोय."
"बाळासाहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये जो हिंदुत्वाचा विचार घेऊन जे पुढे जात होते. त्या विचाराच्याच विरोधात जाऊन उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी नैतिकता हा उद्धव ठाकरे सारखा माणूस बोलतो. हा सर्वांत मोठा जोक आहे. कारण का नैतिकता आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नाही." अशी टीका नितेश राणेंनी यावेळी केली.