मुंबई : नवीन उदयास येणाऱ्या माध्यमांपैकी स्टोरीटेल ऑडिओबुक्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. याबाबत अभिनेता अजय पुरकर याने आपले मत मांडले आहे. स्टोरीटेलसाठी अजयने पु. ल. यांच्या काही कथा आपल्या आवाजात रेकॉर्ड केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपले अनुभव शेअर केले.
अजय म्हणाले, "आज सगळ्यात मोठ व्हिजुअल माध्यम असल तरी स्टोरीटेल सारख्या संकल्पनेचं मला कौतुकच वाटत, ड्रायव्हिंग करताना मी सुद्धा स्टोरिटेलवरील ऑडीओ बुक्स ऐकलेली आहेत. जे मला ऐकायचं असतं ते मी कायम ड्रायव्हिंग करताना ऐकतो. आपण ऑडीओ बुक्स ऐकतानाही त्या कथेत तितकेच रमतो. सो हेडफोन्स लावून तुम्ही ते ऐकू शकता, आणि त्यासोबत मेकॅनिकली आपली काम करू शकतो. मला वाटतं ही स्टोरीटेलची सर्वात मोठी उपलब्धी आहे. आणि म्हणूनच स्टोरीटेल आज बऱ्यापैकी लोकांमध्ये पॉप्युलर असून लोक ते ऐकतात. मुद्दामून सांगायची गोष्ट अशी की माझ्या आई-वडिलांना वाचण्याचा खूपच छंद होता, अजूनही आहे. आता माझे वडील जवळ 78 वर्षाचे आहेत आणि वयोमाना परतवे दुर्दैवाने त्यांची दृष्टी कमी झाली. म्हणून आम्ही त्यांना स्टोरीटेल ऐप घेऊन दिले आहे. हेडफोन्स लावून त्यांच्या आवडीच्या साहित्याचा दिवसभर ते आनंद घेत असतात. जे तरुणपणी खूप वाचत होते पण आता दृष्टी अधू झाल्याने वाचता येत नाही, त्या लोकांसाठी स्टोरीटेल ॲप वरदान म्हणता येईल. हे उदाहरण माझ्या स्वतःच्या घरात आहे आणि म्हणून मी स्टोरीटेलला धन्यवाद देऊ इच्छितो."
वाचन नेहमीच आपले प्रबोधन करते. त्यासाठी आपण काही करावे अशी मनीषा बाळगत अजय यांनी रेकॉर्डिंग आपल्या आवाजात केले होते. यानिमित्त माझ्या आई वडिलांनाही वाचनाची पर्यायी ऐकण्याची सवय लागली.