गौतम अदानींची चौकशी नको

01 May 2023 22:19:56
ubt

मुंबई
: महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा बीकेसीत आज पार पडली. या सभेतून उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, " गौतम अदानींची चौकशी करू नका तर त्यांचे संपूर्ण आत्मचरित्रचं शालेय अभ्यासक्रमात लावा, श्रीमंत कसं व्हायचं." असा उपरोधिक टोला ठाकरेंनी लगावला.

“चौकशी पाहिजे की श्रीमंती पाहिजे? बरोबर ना! मी कुठे म्हणतोय ते गुन्हेगार आहेत. चौकशी करा म्हणतच नाहीत. पण निदान त्यांनी काय केलं जे कष्ट करणारी लोकं घाम गाळून सुद्धा त्यांना रोजची चिंता असते की, संध्याकाळी घरची चूल कशी लागेल. त्यांना ते मार्गदर्शक होईल ना. अदानी व्हायचंय मला. आम्ही अडाणी आहोत, अदानी व्हायचं आहे”, असा टोल उद्धव ठाकरे यांनी लगावला.
Powered By Sangraha 9.0