संविधान रक्षणासाठी 'वज्रमूठ' सभा... - संजय राऊत

01 May 2023 14:59:32
sanjay raut

मुंबई
: आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेचे आयोजन केले आहे. वांद्रे कुर्ला संकुलात वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ठाकरे गट प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले, आजची वज्रमुठ सभा ही संविधान आणि महाराष्ट्र संरक्षणासाठी आयोजित केली आहे. तसेच, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचे देशाच्या संविधानावर नव्हे, तर ' मन की बात' वर प्रेमवर असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

'मन की बात'वर प्रेम करण्यापेक्षा संविधानावर प्रेम केले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असेही राऊत यावेळी म्हणाले. महाराष्ट्र दिनाला सभा आयोजित करुन महाराष्ट्र संरक्षण आणि संविधान संरक्षणासाठी महाविकास आघाडी प्रयत्न आहे. दरम्यान, बीकेसीतील वज्रमुठ सभेला महाविकास आघाडीचे नेते हजर असणार आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे सबोधित करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांची भाषणे होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्यावतीने भाई जगताप आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना वज्रमुठ सभेला संबोधित करता येणार आहे.



Powered By Sangraha 9.0