मुंबई : शास्त्रीय गायक महेश काळे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीची जगप्रसिद्ध आहेत. ते परदेशात राहत असताना तेथील संगीताची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस सुद्धा घेतात. असे असतानाही भारतीय संगीताकडे त्यांनी पाठ फिरवलेली नाही. भारतीय संगीताचा प्रसार करताना त्यांच्याकडून फसलेल्या प्रयत्नांवर भारतीयांकडून यथेच्छ खिल्ली उडवली जातेय. असे असताना महेश याना मराठी काँग्रेसमन, मराठी संस्कृती जपण्यासाठी मिळतं ते सन्मानपत्रही त्यांना डेट्रॉईट कडून प्राप्त झाले आहे.
डेट्रॉईट येथील महाराष्ट्र मंडळाचे आभार मनात महेश काळे म्हणाले, "आपण करत असलेल्या आपल्या कलेच्या सांगोपनाची दखल जेव्हा परदेशी घेतली जाते, तेव्हा त्याचा एक वेगळा आनंद होतो, समाधान मिळतं. नुकत्याच "स्वरोत्सव" या माझ्या दौऱ्या दरम्यान अमेरिकेतील Detroit या शहरामध्ये मला US House of Representatives चं US Congressman श्री ठाणेदार यांच्याकडून एक Proclamation (सन्मानपत्र) मिळालं. एका मराठी कलाकाराला अमेरिकेचा एक मराठी Congressman भारतीय संस्कृती जोपासण्याकरता गौरव करतो तेव्हा मन भरून येतं."