मुंबई : सुप्रसिद्ध गायक ए आर रेहमान यांच्या गाण्याच्या कार्यक्रमांना नेहमीच गर्दी होते. मात्र नुकत्याच झालेल्या पुण्यातील एका कार्यक्रमातून चाहत्यांना भर रंगात आलेल्या कार्यक्रमातून उठून जावे लागले. रात्री कार्यक्रम संपायला उशीर झाल्याने पोलिसांना कार्यक्रम बंद करावा लागला अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होते.
कोणताही कार्यक्रम रात्री १० नंतर सुरु ठेवण्यास कायद्याची संमती नाही. परंतु कार्यक्रम ऐन भरात असताना चाहत्यांना उठून जावे लागले. पोलिसांनी तडक रंगमंचावर जाऊन रहमान यांची कान उघाडणी केल्यानंतर, झालेल्या चुकीबद्दल कोणतीही प्रतिक्रिया न देता रेहमान रंगमंचावरून परस्पर निघून गेले. पुणे पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारीही कुटुंबीयांसह या कार्यक्रमाला हजर होते. परंतु रात्रीचे 10 वाजल्यानंतरही कार्यक्रम सुरूच ठेवल्याने पोलिसांना हा निर्णय घ्यावा लागला.