काव्य गीत सौरभ कार्यक्रमांनी जिंकले प्रेक्षकांचे मन

09 Apr 2023 18:45:41
kavya geet saurabh programme

कल्याण
: माईण्ड आणि सउलच्या ॲड. मनिषा सूर्यराव, रश्मी शर्मा व काव्य किरण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या "काव्य गीत सौरभ " या कविता व गाण्याच्या कार्यक्रमांनी प्रेक्षकांना जिंकून घेतले. हा कार्यक्रम टि. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बेतुरकर पाडा येथे नुकताच पार पडला. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे सल्लागार जनार्दन ओक, मुथा महाविद्यालयाचे प्रकाश मुथा, अग्रवाल महाविद्यालयाचे मुन्ना पांडे, टि. एस. स्कूल चे सदानंद तथा बाबा तिवारी, काव्य किरण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख व रश्मी शर्मा हे होते.

kavya geet saurabh programme

या कार्यक्रमात काव्य किरण मंडळाच्या प्रवीण देशमुख, सतिश केतकर, मनोहर मांडवले, अनिल अटाळकर, माधुरी वैद्य, संजीवनी जगताप, स्वाती नातू, विभा लिंगायत, मंजिरी पैठणकर, कौसल्या पाटील, सुनील म्हसकर, मदनकुमार उपाध्याय, अरविंद बुधकर, मंगला कांगणे, मनिषा सूर्यराव, विजयराव मदन यांनी आपल्या कविता सादर केल्या. तर शर्वरी ओक, मनोहर मांडवले, कुमारी वैष्णव, मनिषा सूर्यराव यांनी काही गाणी सादर केली.

kavya geet saurabh programme

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर ओक यांनी केले. कार्यक्रमाला शुभेच्छा देतांना प्रकाश मुथा यांनी काव्य किरण मंडळ रश्मी शर्मा व ॲड. मनिषा सूर्यराव यांचे कौतुक केले. मंडळाचे सभासद कवी व लेखक अरविंद बुधकर व माधुरी वैद्य यांचा खास उल्लेख करत त्यांनी अशा कार्यक्रमासाठी तिन्ही महाविद्यालयांची सभागृहे नेहमी उपलब्ध असतील याची ग्वाही दिली. हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. त्याला रसिकांचीही साथ होती. उत्तम गाणी सादर केल्याबद्दल सुनील म्हसकर यांच्या वतीने रू ५०१/- चे रोख पारितोषिक देवून कुमारी वैष्णवचे कौतुक करण्यात आले.


Powered By Sangraha 9.0