मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले रामललांचे दर्शन!

09 Apr 2023 17:35:35
eknath-shinde-and-dcm-devendra-fadnavis-at-ayodhya

नवी दिल्ली
: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अयोध्या शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यासह स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अयोध्येतील मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन घेतले. तसेच त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानंतर उभयतांनी अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिर परिसराला भेट देऊन बांधकामाची पाहणी करून त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, कामगार मंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यासोबतच खासदार राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे आदी उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0