‘ईडी’ने आवळल्या अनिल जयसिंघानीच्या मुसक्या

08 Apr 2023 17:59:36
ED arrests Anil Jaisinghani in money laundering case linked to IPL betting

मुंबई
: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ‘ईडी’ (अंमलबजावणी संचालनालय) ने अनिल जयसिंघानीवर धडाकेबाज कारवाई केली आहे.

‘ईडी’कडून अनिल जयसिंघानी याला अहमदाबादमधून अटक केल्यानंतर त्यांच्यावर दहा हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉण्ड्रिंग) केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.अर्थिक गुन्हे प्रकरणातील अनिल जयसिंघानी तब्बल सात वर्षांपासून फरार होता. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. अमृता फडणवीस यांच्या प्रकरणानंतर त्यांच्यावर कारवाईसाठी पोलीस शोध घेत होते. त्यास काही दिवसांपूर्वीच गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले असून मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली असून दोघांनी केलेल्या गैरव्यवहार, धमकी आणि लाच प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.


Powered By Sangraha 9.0