मुंबई : भारतीय परंपरा आणि संस्कृती जपत आधुनिकतेचाही ध्यास धरत वस्त्रप्रावरणांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या दादर येथील आसोपालवची नवी शाखा ठाणे पश्चिम येथील स्टेशन रोडवर सुरु करण्यात आली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे शानदार उद्घाटन करण्यात आले असून ग्राहकसेवांसाठी हे नवे दालन खुले झाले आहे.
आसोपालव म्हणजे अशोकाचे झाड – एक तेजस्वी, सदाहरित वृक्ष जे ताजेपणा, पुनरुज्जीवन आणि चांगल्या आरोग्याचे प्रतीक आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात ही फुलांचे तोरण व हार घालून होते. अशाच प्रकारे हारामधील झेंडूची फुले व हिरव्या रंगाचं पान त्या हाराची शोभा वाढवत अगदी त्या प्रमाणे आसोपालव परिवार प्रत्येक स्त्रीच्या वेशभूषेची शोभा वाढावी यासाठी प्रयत्नशील असतो. भारतीय पारंपारिक आणि फॅशन परिधानांच्या उत्पादनात आणि व्यापारात आघाडीचे नाव आहे. हा वारसा जपत या ठिकाणी रमेश गोगरी यांच्या संकल्पनेतून वस्त्रप्रावरणांना सादर करण्यात आले आहे.
विविध सण, मुहूर्त, प्रसंग, लग्नाचे बस्ते यांच्या वेळी निश्चितपणे ग्राहकांची गरज पुरवण्यासाठी या ठिकाणी सर्व प्रकारच्या साड्या इथे आहेत. आधुनिक प्रकारातील साड्यादेखील इथे आहेत. सुमारे ६ हजार चौरस फूट जागेवर वसलेल्या आसोपालव दुकानामध्ये तीन मजले असून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांचे प्रदर्शन आहे. पैठणी, बनारसी, उत्तर व दक्षिण भारतीय तसेच अन्य प्रकारच्या वैविध्यपूर्ण साड्या इथे उपलब्ध आहेत. त्यांची नक्षी तसेच कलाकुसर ही महिला ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, असा विश्वास रमेश गोगरी यांनी व्यक्त केला आहे.