...म्हणून मराठीला अभिजात दर्जा मिळत नाही

28 Apr 2023 13:09:25

 

 
abhijat marathi
 
मुबई : भारत हे विविध भाषा आणि विविध संस्कृतींनी नटलेले राष्ट्र आहे. भाषा ही संस्कृतीचा अविभाज्य घटक असते. भारतात अनेक भाषा आणि त्याहीपेक्षा जास्त बोलीभाषा आहेत. मध्यंतरी भाषांना अभिजात दर्जा देण्याविषयी चर्चा झली आणि काही भाषांना तो दिला गेला. तो दर्जा मराठीला मात्र कित्येक वर्षे पाठपुरावा करूनही मिळवता आला नाही.
 
अभिजात दर्जा देताना त्यासाठी काही निकष बनवले गेले. त्या चार निकषांच्या आधारे जी भाषा लिखित नियमांत बसते त्याच भाषेला अभिजात दर्जा दिला जातो. हे नियम आहेत, १) भाषा प्राचीन असावी आणि त्यात श्रेष्ठ दर्जाचे साहित्य निर्माण झालेले असावे. २) त्या भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे. ३) त्या भाषेला भाषिक आणि वाड्मयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे. ४) प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा.
 
यातील, पहिल्या तीन निकषांच्या आधारे मराठी उत्तीर्ण होत असली तरीही शेवटचा निकष वाचता पहिले तीनही निकष बाद होतात. आणि म्हणूनच अजूनपर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाही. परंतु महाराष्ट्राने केलेली मागणी पाहता अभिजात दर्जाचे काय ठरेल हे सांगणे कठीण आहे.
Powered By Sangraha 9.0