गंगाराम गव्हाणकरांना 'मानाचि'

    27-Apr-2023
Total Views |

manachi
 
मुंबई : 'मानाचि लेखक संघटना' आपला ८ वा वर्धापनदिन, शनिवार ६ मे २०२३ रोजी, सायं ६.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर (मिनी थिएटर) येथे साजरा करीत आहे. या कार्यक्रमात २०२२ सालात विविध माध्यमात प्रशंसनीय लेखन करणाऱ्या लेखकांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच, आदरणीय नाटककार व पटकथाकार श्री. गंगाराम गवाणकर यांना 'लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार’ दिला जाणार आहे.
 
‘मानाचि लेखक संघटना’ मराठी भाषेतील मालिका, नाटक व चित्रपटांच्या हौशी व व्यावसायिक लेखकांची संघटना असून, २०१६ पासून रजिस्टर्ड कंपनी म्हणून सर्व माध्यमात लेखन करणाऱ्या कवी व लेखकांच्या उत्कर्ष व सन्मानासाठी कार्यशील आहे. १५० हून अधिक लेखक सभासद असलेली 'मानाचि' संघटना, परस्पर संवादातून लेखकांच्या समस्यांचे निराकरण करून, त्यांना यथोचित ‘मान’ व ‘धन’ ही मिळावे, यासाठी सदैव जागरूक व कार्यरत आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.