भारत हा मोदी-सावरकरांचा नाही तर नेहरू-गांधींचा देश : प्रणिती शिंदे

26 Apr 2023 10:50:33

(Praniti Shinde)

भारत हा मोदी-सावरकरांचा नाही तर नेहरू-गांधींचा देश : प्रणिती शिंदे

मुंबई : भारत हा सावरकरांचा नव्हे, गांधी-नेहरूंचा देश आहे. असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. वीर सावरकर यांच्याविषयी माझ्या मनातही आदर होता. मात्र मी ‘सहा सोनेरी पानं’ हे पुस्तक वाचलं आणि माझं मत बदललं. असं वक्तव्य करुन नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न प्रणिती शिंदेनी केला आहे.
सोलापूरच्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, "सावरकर यांच्या 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात सावरकरांबद्दल शंका निर्माण झाली. सावरकरांबद्दल माझ्या मनातही आदर होता. मात्र, त्यांचे सहा सोनेरी पाने हे पुस्तक वाचल्यानंतर आपण सगळे शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानता. त्यांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकात सावरकरांनी महाराजांबाबत अपमान केला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द लिहिले आहेत.'मोदीजी तुम्ही कितीही प्रयत्न करा हा देश नेहरू गांधींचाच असेल, मोदी सावरकरांचा कधीच नसेल." असे प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांबाबत वक्तव्य केलं होते. शिवानी म्हणाल्या होत्या की, "बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, अशा विचारांचं सावरकरांनी समर्थन केलं. हे लोक फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. तर सावरकरांवर मोर्चा काढतात. सावरकरांचे विचार होते, बलात्कार हे राजकीय हत्यार आहे."
 
Powered By Sangraha 9.0