पीएफआयविरोधात भाजपनेच कारवाई केली!

25 Apr 2023 17:23:50
 
amit shah
 
 
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई सुरू आहे. एनआयएने सोमवारी देशभरातील पीएफआयच्या जवळपास १७ ठिकाणांवर छापेमारी केली आहे.
  
प्राप्त माहितीनुसार, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब आणि गोवा येथे छापेमारी केली. एनआयएने बिहारमधील 12 ठिकाणी, यूपीमध्ये दोन आणि पंजाबमधील लुधियाना आणि गोव्यातील प्रत्येकी एका ठिकाणी छापेमारी केली. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील उर्दू बाजार येथील दंतचिकित्सक डॉ. सारिक रझा यांच्या घरावर एनआयएने छापा टाकला आहे. सिंगवाडा पोलीस ठाण्यांतर्गत शंकरपूर गावात राहणाऱ्या मेहबूबच्या घरावरही पीएफआय लिंक्स प्रकरणी छापा टाकण्यात आला आहे.
 
एनआयएचे पथक पूर्व चंपारण जिल्ह्यातील चकिया पोलीस स्टेशन परिसरात पोहोचले. पीएफआय मॉड्यूलचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने चकियाच्या कुआवान गावात छापा टाकण्यात आला. कुवान येथील फारुख अन्सारी यांचा मुलगा सज्जाद अन्सारीच्या शोधात एनआयएच्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली.
 
केंद्य गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारासाठीच्या जाहिर सभेत काँग्रेसवर टिका केली. ते म्हणाले, पीएफआयमुळे राज्यावर वाईट परिणाम झाला होता आणि गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेसने याबाबत काहीही केले नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका दिवसात पीएफआयशी संबंधित सर्वांना तुरुंगात टाकले. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी भाजप कोणतीही तडजोड करत नाही, असेही केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी म्हटले.
 
 
Powered By Sangraha 9.0