क्रिकेटच्या देवाचा ५० वा वाढदिवस प़ृथ्वीवरच्या स्वर्गात!

24 Apr 2023 14:23:11
 
Sachin Tendulkar
 
 
सिंधुदुर्ग : क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आज आयुष्याच 'अर्धशतक' पुर्ण केलं. यानिमित्त तेंडुलकर
 दि. २४ एप्रिल रोजी कोकणात परुळे गावांतील सागर किनारी मनमुराद आनंद लुटला. शिवाय तो गावात क्रिकेट ही खेळला. यावेळी तेंडुलकरने गावातील गावकऱ्यांसोबत संवाद साधला. क्रिकेटच्या निमिताने सचिन जगभर फिरला आहे. परंतु भोगवे निवती सारखा सुंदर - स्वच्छसागर किना-यावर फिरताना विशेष आनंद झाला. असे तेंडुलकरने सांगितले.
 
आपला ५० वा वाढदिवस साजरा करीत, त्याने परुळे भोगवे हॉटेलमध्ये मुक्काम केला. किल्ले निवती भोंगवे सागर किनान्याला फेर फटका मारला. व यावेळी सर्वच क्रिकेटप्रेमीना त्याच्या दर्शनाने खुपच आनंद झाला. तेंडुलकरने सर्वांसोबत फोटो काढले. यावेळी त्याचे सहकारी उपस्थीत होते.
 
सचिनने त्याच्या प्रदिर्घ कारकिर्दीत अनेक मोठ मोठे विक्रमांना गवसणी घातली आहे, जी सहजासहजी कोणालाही मोडता कठीण आहे. तो या शतकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याच अनेक दिग्गज खेळाडूंनी या आधीच सांगितलं आहे. अप्रतिम प्रतिभेसह जन्माला आलेला, कठोर परिश्रमाने आपले आयुष्य घडविणारा आणि योग्य वेळी योग्य त्या दिशेने पैलू पाडण्यात आचरेकर सरांसारखा गुरू लाभणारा सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव कधी बनला ते समजलज नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0