मुंबई : अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. हिंदू दिनदर्शिकेनुसार या दिवसाला मोठे महत्व प्राप्त होते. या दिवशी कोणत्याही वेळी कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यास तो शुभ मुहूर्तच ग्राह्य धरला जातो. आदिपुरुष या चित्रपटाचे पोश्टर या दिवशी प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटाचे पहिले पोस्टर पाहून समाजातून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून नवी तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट यावर्षी जून महिन्यात प्रदर्शित होत आहे. ५ भाषांमध्ये प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर टीम मधील सर्व सदस्यांनी आपल्या समाज माध्यमांवरून प्रदर्शित केले आहे. यावेळी त्यांनी लिहिले आहे, “जब न जा पाओ सारे धाम, तो बस ले लो प्रभु का नाम, जय श्रीराम।”